Sukhant Last Rituals Yamraj Service: विविध धर्मांमध्ये माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केल्या जाणाऱ्या धार्मिक संस्कार व विधींना विशेष महत्त्व आहे. मात्र आजच्या विखुरलेल्या जगात अनेकदा आपल्याच रक्ताच्या नात्याच्या मंडळींनाही आपल्यासाठी जिवंतपणी वेळ काढणे शक्य होत नाही, अशावेळी मृत्यूपश्चात करावयाचे विधी पद्धतशीर होतील याची शाश्वती देता येत नाही. आपण आयुष्यभर ज्या मानाने राहतो त्याच मानाने आपले अंत्यसंस्कारही व्हावे अशी अनेकांची इच्छा असते याच इच्छेने मराठमोळ्या संजय रामगुडे यांच्या व्यवसायाचा पाया रचला आहे. ठाणे बिझनेस यात्रेच्या निमित्ताने नवनवीन संकल्पनाचे स्टार्टअप चर्चेत आले होते मात्र यात सुखान्त अंत्यसंस्कार कंपनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२०१४ साली संजय रामगुडे या मराठमोळ्या व्यक्तीने अंत्यसंस्काराची कंपनी सुरु केली. आपल्या आयुष्याचा अंत सुखाचा व्हावा या हेतूने या कंपनीचे नाव सुखान्त असे ठेवण्यात आले. आतापर्यंत २५,००० हुन अधिक अंत्यसंस्कार या कंपनीमार्फत करण्यात आले आहेत. संजय यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, करोनाकाळात दोन वर्षांमध्ये या कंपनीने शेकडो निराधारांचे अंत्यसंस्कार केले आहेत. आतापर्यंत ५० लाख रुपयांचा व्यवसाय रामगुडे यांनी केला असून या कामात त्यांच्यासह २० कर्मचारी कार्यरत असतात.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुढील तीन वर्षात २००० कोटीचे मार्केट व्यवस्थापित करण्याचा संजय यांचा मानस आहे. प्राप्त माहितीनुसार संजय यांच्या कंपनीसह २२० खांदेकरी, अंत्यसंस्कार विधी करणारे २० भटजी , व १० शववाहिकांचे टाय अप आहे. २४ तास ही सेवा उपलब्ध असून यात अंत्यसंस्कार व पिंडदान, अस्थिविसर्जन, तेरावं, चौदावंपर्यंतचे सगळे विधी तसेच त्यानंतर पक्ष, मासिक व वार्षिक श्राद्धाचे पॅकेज उपलब्ध आहेत. इतकेच नव्ह तर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू दाखला देण्यापासून त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ त्यांनीच दिलेला एक आवडीचा शेवटचा फोटो फ्रेम करण्यापर्यंत सर्व काही या कंपनीच्या माध्यमातून पार पाडले जाते.

हे ही वाचा >> Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

दरम्यान, या सगळ्यासाठी संजय यांनी अत्यंत वाजवी दरात अंत्यसंस्कार पॅकेज तयार केले आहेत. यातील सर्वात बेसिक पॅकेज हे साडे आठ हजारापासून सुरु होत असून त्यांच्याकडे ३७ हजारापर्यंत पॅकेज उपलब्ध आहेत. हे पॅकेज घेताना संपूर्ण रक्कम अॅडवान्स जमा केल्यास मृत्यूपूर्वी उर्वरित आयुष्यात प्रत्येक वाढदिवसाला पार्टी व आकर्षक गिफ्ट देण्याची सुद्धा योजना यात समाविष्ट आहे.