कधी कोणाचा काळ येईल हे सांगता येत नाही त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकदा लोक स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्याबरोबर खेळतात. आयुष्य म्हणजे खेळ नाही. आपल्याला मिळालेले आयुष्य आपण आनंदाने जगले पाहिजे पण आनंदाने जगताना स्वत:च जीव धोक्यात येईल असे करू नये. पण हीच चूक अनेक जण करतात स्वत:चा जीव गमावतात.
सोशल मीडियावर स्टंट बाजी करणार्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी व्हिडीओसाठी तर कधी क्षणिक आनंदासाठी लोक स्वत:च्या जीवाची पर्वा करत आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर मजा मस्ती करताना लोकांना परिस्थितीचे भान राहत नाही. मस्करी करता करता असेही काही घडते ज्याची कल्पनाही कोणी केलेली नसते. असाच काहीसा प्रकार काही तरुणांबरोबर घडला आहे. तळ्याकाठी मित्रांबरोबर पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तरुणांबरोबर असे काही घडले जे ते आयुष्यभर विसरू शकत नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मस्ती जीवावर बेतली
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एका तळ्यामध्ये काही तरुण पोहण्यासाठी उतरले आहेत. दरम्यान एक जण तळ्याकाठी असलेल्या झाडावर चढतो. झाडाच्या एका फांदीवर उभा राहून तो तरूण जोरजोरात ती फांदी हलवतो. दरम्यान अचानक त्याचा तोल जातो. सावरण्यासाठी तो हाताला येईल ती फांदी पकडतो. फांदीबरोबर तो नदीच्या काठावर फेकला जातो आणि जोराद जमिनीवर आपटून पुन्हा तळ्यात पडतो. तो इतक्या जोरात जमिनीवर आपटतो ती तिथेच तो बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. इतरांना काही कळण्याआधीच हे सर्व घडते. तरुणाला पडलेले पाहाताच सर्वजण धावत येतात आणि त्याला पाण्यातून बाहेर काढतात आणि व्हिडिओ तिथे संपतो. व्हिडीओमधील तरुणाचा जीव वाचला की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकरी काय म्हणाले
इंस्टाग्रामवर dnyaneshwar1217d नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “अशी मस्ती करू नका रे” व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
एकाने कमेंट केली की, “यांच्या अंगात खूप मस्ती किती आहे, स्वत:च्या चुकीने झालं असे.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “पाण्याजवळ मस्ती नको,”
तिसऱ्याने कमेंट केली की,”त्याने ज्या फांदीला पकडले त्यामुळे खाली पडताना तो तळ्याच्या बाहेर पडला, त्यानं ती फांदी तिथेच सोडली असती तर तो पाण्यात पडला असता आणि एवढं लागले नसते.”