सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे अंगावरुन जात असताना एका आईने शरीराची ढाल करुन तिच्या बाळाचा वाचवले. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
असं म्हणतात, शेवटी आई ती आईच असते. बाळावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करते. या व्हिडीओत सुद्धा आईने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बाळाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ रेल्वे स्टेशनवरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चालत्या रेल्वेखाली एक महिला खाली वाकून बसली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वाटेल की ही महिला स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतेय पण जेव्हा अंगावरुन ट्रेन जाते त्यानंतर कळते की ही महिला तिच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ढाल बनून ट्रेनखाली वाकून बसली होती. दैव बलवत्तर म्हणून या महिलेचा आणि बाळाचा जीव वाचला. अंगावरुन ट्रेन गेली तरी दोघांना कोणतीही दुखापत झाली. ट्रेन गेल्यानंतर अनेक लोकं या महिलेजवळ धावत आले आणि बाळ व महिलेला रेल्वे रुळावरुन बाजूला आणले. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. विशेष म्हणजे या आईचे कौतुक करावे तितके कमी आहे.
Aisha Dar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे धक्कादायक आहे पण खंरय. पाहा आई आणि नवजात बाळ मृत्यूच्या दाढेतून कसे वाचले. आईला खरंच सलाम. ट्रेन जात पर्यंत ती बाळासाठी ढाल बनून राहली.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिला तीन लाख रुपये बक्षिस मिळायला पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “आई अशीच असते. स्वत:चा जीव धोक्यात घालून ती मुलांना वाचवते. सर्व आईंना खूप खूप प्रेम” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढी घाई कशाची!लोकांनी नीट पाहून चालायला पाहिजे”