Mother’s Phone Addiction Viral Video: मोबाईलचं ॲडिक्शन ही सध्याच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे. आजकाल लोक आजुबाजूच्या लोकांसोबत वेळ घालवण्याऐवजी मोबाईलमध्ये डोक घालून बसतात.फोनमध्ये व्यस्त असणाऱ्या अनेकांना आजुबाजूला काय घडतंय, आपण काय करतोय याचे भानच राहत नाही. यामध्ये लहानच नाहीतर मोठ्या व्यक्तीही मोबाईलच्या आहारी गेलेल्या आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक बाई फोनमध्ये व्यस्त आहे. फोनवर बोलता बोलता ती कचरा टाकायला जात होती, यावेळी तिचे लहान मुल तिच्या कडेवर बसले आहे. दरम्यान पुढे ती असं काही करते की तुम्हीही शॉक व्हाल. ती महिला कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकण्याएवजी आपल्या बाळालाच टाकते आणि निघून जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका आईनं मोबाईलच्या नादात आपल्या लहान बाळाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं..याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कचऱ्याऐवजी चक्क बाळाला फेकलं

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला आणि तिच्यासोबत एक लहानसा चिमुकला कडेवर घेऊन जात आहे. यावेळी महिलेने चिमुकल्याला आपल्या कडेवर उचलून घेतले आहे आणि ती मोबाईलवर बोलण्यात पूर्णपणे व्यस्त दिसत आहे. काही वेळात ती कचरा टाकण्यासाठी येताना दिसत आहे, मात्र ती कचरा डस्टबिनमध्ये फेकण्याऐवजी तिच्या कडेवर असलेल्या चिमुकल्यालाच डस्टबिनमध्ये टाकते आणि निघून जाते. काही पावलं चालल्यानंतर परत जाताना तिच्या लक्षात आलेले दिसते की, तिने कचऱ्या ऐवजी मुलाला डस्टबिनमध्ये फेकलं. यावेळी ती पुन्हा धावत मागे येते.

पाहा व्हिडीओ

नेटकरीही संतापले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ naveen_gaikwad13 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे की, ‘स्मार्टफोनपेक्षा आपल्या मुलांची काळजी घ्या’. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की,’ तुम्ही ज्या गोष्टींचे मालक असता ज्या गोष्टींवर ताबा मिळवता ती गोष्टच एक दिवस तुमचा ताबा घेत असते.’ काहींनी हा व्हिडिओ म्हणजे नाटक असल्याचे म्हटले आहे. ठरवून व्हिडिओतल्या सगळ्या कृती केल्याचे जाणवत आहे.