सोशल मीडियावर एका रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग रुग्णाला बाहेर जाण्यासाठी साधी व्हिलेचेअर किंवा स्ट्रेचर देखील देखील देण्यात आलेले नाही. तो रुग्ण हाताचा आधार घेऊन जमिनीवर सरकत आहे. धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सरकारी रुग्णालयातील अवस्था दर्शवणारा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णाला वॉर्डमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे व्हिलचेअर नसल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप होत आहे.हा व्हिडिओ पुण्यातील सरकारी रुग्णालयातील असल्याचा दावा केला जात आहे.

पुण्यातील व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एका हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दिव्यांग रुग्ण दिसत आहे. रुग्णाच्या एका पायाला दुखापत झालेली असून त्याच्या एका पायाला पट्टी बांधलेली आहे. हा रुग्ण दोन पायांवर उभा देखील राहू शकत नाही तरीही त्याला व्हिलचेअर किंवा स्ट्रेचर दिलेले नाही. रुग्णाला जमिनीवर बसून सरकत सरकत पुढे जावे लागत आहे. दोन्ही हात आणि एका पायाच्या मदतीने तो जमिनीवर पुढे पुढे सरकताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण अपघातात पाय गमावल्यानंतर उपचारासाठी आला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर बाहेर सोडण्यासाठी तिथे व्हीलचेअर उपलब्ध नव्हती.

साम टीव्हीशी बोलताना, रुग्णाने माहिती दिली की “माझ्या पायाला दुखापत झाली होती, म्हणून मी रुग्णालयात आलो. त्यांनी फक्त माझ्या पायाला मलमपट्टी केली आणि मला पाठवले. त्यांनी मला व्हीलचेअरही दिली नाही. कोणच्याही मदतीशिवाय मी स्वतः बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होतो. मी नागपूरहून इथे आलो आहे, पुण्यात माझे कोणी नाही.

नेटकऱ्यांचा संताप


व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रुग्णालय व्यवस्था आणि रुग्णाची होणाऱ्या गैरसोयीबाबत रोष व्यक्त केला आहे.

व्हिडीओवर कमेट कर अनेकांनी रोष व्यक्त केला. एकाने कमेंट करत म्हटले की, एका सरकारी रुग्णालायता दिव्यांग रुग्णाला मुलभूत सोयी सुविधा देखील दिल्या जात नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे. याविरोधात कारवाई रुग्णालय प्रशानसनाविरोधात कारवाई केली पाहिजे.

दुसऱ्याने कमेटं केली की, “रुग्णालयातून नुकतेच डिस्चार्ज झालेला रुग्ण व्हीलचेअरच्या अभावामुळे त्रास सहन करताना दिसला. हीच का विकसित भारतची आरोग्यसेवा?

सरकारी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि रुग्णसेवेतील त्रुटी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.”

तिसऱ्याने कमेंट केली, “गेल्या अनेक दशकांपासून कोणतेही सरकार या समस्या का सोडवू शकले नाही आणि का नाही? इतरत्र जिल्हास्तरीय रुग्णालयांची परिस्थिती काय असेल याची कल्पना करा!! आता कुठे गेले आहेत ते सर्व राजकीय संघटना?? खाजगी रुग्णालयांवर दगडफेक करणारे!!”