लहान मुले ही फुलांसारखी नाजूक असतात. त्यांना अगदी फुलांप्रमाणे जपावे लागते. पण काही लोक रिल्स आणि व्हिडीओसाठी आपल्या लेकरांचा जीव धोक्यात टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका लहान लेकराबरोबर जे केले ते पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होत आहे.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून जात आहे. दुचाकीच्या हँडलवर एक पिशवी लावलेली आहे. त्या पिशवीमध्ये एक लहान बाळ ठेवल्याचे दिसत आहे. पिशवी दोरीने बांधली असली तरी लहान लेकराच्या जीव धोक्यात टाकला आहे. चुकूनही लहान बाळाला कशाची धडक बसली किंवा पिशवी फाटली तर त्याच्या जीवावर बेतू शकते. पण याचा कसलाही विचार न करता लेकराचा जीव धोक्यात टाकून व्यक्ती प्रवास करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होत आहे.
नेटकऱ्यांचा संताप अनावर
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर theindiansarcasm हा पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
एकाने कमेंट केली,”हे खूप धोकादायक आहे. कोणी असे कसे करू शकतो.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “हे अत्यंत धोकादायक आहे. असे करू नका.”
तिसऱ्याने कमेंट केली की, खूप धोकादायक आहे, “मुलांची छोटीशी दुखापतही सहन होत नाही. ही काय मस्करी करण्याची गोष्ट आहे.”
चौथ्याने कमेंट केली की,”सोशल मीडियासमोर कूल होण्याच्या नावाखाली हे निरर्थक स्टंट थांबवा. हे कृत्य दंडनीय गुन्हा आहे.”
पाचव्याने कमेंट केली की,” कंटेंटच्या नावाखाली ही फालतूगिरी करणे थांबवा… हे सध्या पूर्णपणे मूर्खपणाचे आहे.”
सहाव्याने कमेंट केली की, “नाही हे योग्य नाही, पालकांचे लजास्पद कृत्य”