Waterfall Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही नक्कीच हादरून जाल. १ मिनिटं ११ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये काही पर्यटक धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. मग अचानक पूर येतो आणि हे पर्यटक पाण्यात वाहून जातात. काही क्षणात सर्व काही संपत. हा व्हिडीओ खरं तर मागच्या वर्षीचा आहे. ही दुर्दैवी घटना फिलीपिन्समधील कॅटमॉन टाउन येथील तिनुबदन फॉल्स येथे घडली. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा एक समूह धबधब्याखाली आंघोळ करताना दिसत आहे. यामध्ये काही मुलेही दिसत आहेत. पुढच्याच क्षणी धबधब्याखाली अचानक पाण्याचा पूर येतो आणि लोकांना वाहून घेऊन जातो. हे सर्व काही अचानक घडल्याने तिथे जमलेल्या लोकांनाही काही समजत नाही. या दरम्यान काही लोक धबधब्याच्या पलीकडे जाण्यात यशस्वी होतात, तर बहुतेक पाण्यात वाहून जातात. ही घटना खरंच मन हेलावून टाकणारी आहे.
धबधब्याखाली पुर आला आणि लोकांना वाहून घेऊन गेला…
( हे ही वाचा: लग्नात बेभान नाचत होतं ‘हे’ जोडपं; पण व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी काही वेगळंच पाहिलं)
हा व्हिडीओ ट्विटरवर @TansuYegen या नावाने शेअर केला असून त्याने कॅप्शन मध्ये लिहिलंय की, ‘सोशल मीडियावर तुमच्या लाईक्सच्या संख्येपेक्षा तुमचे आयुष्य महत्त्वाचे आहे.’ या व्हिडीओला आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर लोक हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. याशिवाय शेकडो युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने विचारले आहे की,” या अपघातात कोणी वाचले आहे की नाही?” त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले आहे की “जेव्हा पुराचा इशारा दिला गेला असेल तेव्हा अशा ठिकाणी जाणे टाळावे. कारण तुमचे जीवन अमूल्य आहे, ते पुन्हा मिळणार नाही.”