Viral photo: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगली प्राण्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. वाघ, सिंह, बिबट्या, मगरी अशा खतरनाक शिकाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. बरं, या व्हिडीओंमध्ये कधी कोणी झाडावर चढून शिकार करताना दिसतं, तर कोणी थेट पाण्यात सूर मारतं. काही वेळा तर जबरदस्त टक्करचे मुकाबले सुद्धा होतात. असो, पण यावेळी आम्ही तुम्हाला जमिनीवरची नाही तर आकाशात झालेली शिकार दाखवणार आहोत. हेरॉन या पक्षाचा उंच उडत असतानाच फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षाला शिकार करणं चांगलंच अंगलट आलं आहे. कारण शिकारच जीवावर उलटला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, नक्की काय घडलं?
हे व्हायरल फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हेरॉन पक्ष्याने माशाची शिकार केली आहे मात्र पुढे त्या माशाने हेरॉन पक्ष्याचे चक्क पोट फाडले आहे. माशानं स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी हेरॉन पक्ष्याच्या तावडीतून निसटला आहे. या फोटोंना पाहिलात कि खरंच अनेकांना विश्वास बसणार नाही कि शिकार झालेला मासा, अगदी पोटात जाऊन पक्षाच्या पोटाला चिरून बाहेर येत आहे. पक्षाच्या तावडीतून सुटत आहे. चक्क, मृत्यूला स्पर्श करून येत आहे. शिकार झालेला पण सुटकेत विजय मिळवणारा हा मासा ईल मासा आहे. फोटोमध्ये हेरॉन आपल्या पायांना मागे करून उडताना दिसून येत आहे. या उंच भरारी दरम्यान, ईल माशाने हेरॉनचे पोट फाडून टाकले आहे. बगळ्याच्याच जातीचा हेरॉन हा पक्षी असून तो तयारीचा खेळाडू आहे. त्याच्याकडे सुद्धा तिक्ष्ण नजर आणि खूप जास्त संयम आहे. तो एकाच पायावर दिर्घकाळ उभा राहातो आणि मासा टप्प्यात येताच विजेच्या वेगानं त्याची शिकार करतो. मात्र माशानं बगळ्याला फाडून टाकलं
फोटोग्राफरची कमाल अशी की त्यानं हा क्षण कॅमेरामध्ये अगदी परफेक्ट टिपला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा फोटो @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.