वाघ, सिंहासारख्या रुबाबदार प्राण्यांना मृतावस्थेत पाहून अनेकजण हळहळतात. पण काहीजण विकृत मानसिकतेचे असतात. त्यांना शिकारीतून एक असुरी आनंद मिळतो. दक्षिण आफ्रिकेत ‘लेगेलेला’ सफारीवर गेलेल्या एका जोडप्याने तर कहरच केला. या जोडप्याने सिंहाची शिकार केल्यानंतर त्याच्या बाजूला बसून किसिंग करतानाचे फोटो काढले.

मूळचे कॅनडाचे असलेले डॅरेन आणि कारोलीन कार्टर दक्षिण आफ्रिकेत पर्यटनासाठी गेले होते. लेगेलेला सफारीनेच त्यांच्या फेसबुक पेजवर डॅरेन आणि कारोलीनचे किसिंग करतानाचे फोटो पोस्ट केले होते. मृत सिंहाच्या बाजूला दोघांच्या अशा अवस्थेतील फोटोवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर लेगेलेला सफारीने तो फोटो काढून टाकला.

मृत सिंहाच्या बाजूला किसिंग करतानाच्या फोटोबद्दल कार्टर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे मिररनं दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. ट्रॉफी हंटिंग हा दक्षिण आफ्रिकेतील शिकारीचा एक खेळ आहे. त्यामध्ये या जोडप्याने सिंहाची शिकार केली. वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या या खेळावर बंदी घालावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असून कार्टर दांपत्याच्या या कृत्यामुळे शिकारीच्या बंदीच्या मागणीला जोर आला आहे.

वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या या खेळावर बंदी घालावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असून कार्टर दांपत्याच्या या कृत्यामुळे शिकारीच्या बंदीच्या मागणीला जोर आला आहे.

Story img Loader