पुण्या कधी काय होईल याचा खरचं काही नेम नाही. रोज पुण्यात असे काही घडते जे पाहून पुणेकरही चक्रावतात. कधी पुणेरी पाटी चर्चेत येते तर कधी पुण्यातील लोक चर्चेत येतात. कधी कोणी सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करते तर कोणी नियम मोडून शिरजोर करताना दिसतात. पुणे आणि पुणेकरांबरोबर पुण्यातील पीएमपीएल देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
नुकताच पीएमपीएलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ चर्चेत आला होता. ही महिला थेट सीटवर पाय ठेवून बसली होती. जेव्हा कंडक्टरने तिसा पाय जमिनीवर ठेवण्यास सांगितले तेव्हा महिलेने थेट नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता आणखी एका व्हिडीओमुळे पीएमपीएमल पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी पीएमपीएमल बसचे प्रवासी किंवा कंडक्टर नव्हे तर चालक चर्चेत आला आहे. नाही नाही तुम्हाला वाटते तसे काही झाले नाही. पीएमपीएमल चालकाचे कोणाशी भांडण झाले नाही. पीएमपीएमल चालकाने जे केले त्याची कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक पीएमपीएमल चालक रस्त्याच्या बाजूला बस थांबवून चक्क गुटखा खाण्यासाठी उतरल्याचे दिसते आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे आणि अशा स्थितीत बस बाजूला लावून हा चालक एका गुटख्याच्या दुकानावर गुटखा खरेदी करत असल्याचे दिसत आहे. दुकानाजवळ उभ्या असलेल्या एक व्यक्तीने हा व्हिडिओ शुट केल्याचे लक्षात येते.
प्रवाशांच्या वेळीची त्याला काही पर्वा नाही हे स्पष्टपणे दिसते आहे. या वर्तणूकीमुळे बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतका वेळ प्रवाशांना ताटकळ वाट पाहावी लागत आहे. प्रवाशांच्या वेळीची चालकाला काही किंमत नाही हे स्पष्ट होते.
व्हायरल व्हि़डीओ पुण्यातील विद्यापीठ चौकातील असून म्हाळूंगे ते महानगरपालिका मार्गावर धावणारी पीएमपीएल बसचा आहे. व्हिडिओ एक्सवर@hypernationalst नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त “तलफ वाईट”
एकाने व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, “त्याशिवाय एनर्जी (ऊर्जा) येत नाही”
तर दुसऱ्याने म्हटले की, “गायछाप खाणारे तल्लफ बोलतात.”