Shocking Accident Video : रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये व्यस्त होती, यावेळी समोरून एक भरधाव कार आली अन् तिला थेट उडवले. पण, या भीषण अपघातानंतर तरुणीने मात्र असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघाताची ही घटना सिंगापूरमधील ऑर्चर्ड रोडवरील असल्याचे सांगितले जात आहे. यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये इतकी मग्न होती की, तिने रस्त्यावरील रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केलं आणि चालत सुटली, इतक्यात समोरून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. हे संपूर्ण दृश्य कारमध्ये बसवण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाले आहे, ज्याचा व्हि़डीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

अपघातानंतर कुठे लागलय हे पाहण्याआधी तरुणीने तपासला मोबाईल

D

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावरून चालताना तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग आहे की, तिने रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्ता ओलांडू लागली. इतक्यात सिग्नल ग्रीन झाल्याने वेगाने येणाऱ्या कारने तरुणीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली; यावेळी तिच्या हातातील मोबाइलदेखील दूर फेकला गेला. या घटनेनंतर कारचालकाने कार थांबवली आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी पटकन कारमधून बाहेर पडला. इतक्यात तरुणी उठून बसली आणि ती कुठे लागलय हे पाहण्याऐवजी आधी मोबाइल तुटला तर नाही ना हे पाहू लागते. त्यामुळे अनेक जण हा व्हिडीओ पाहून लोकांना जीवापेक्षा मोबाइल महत्त्वाचा आहे असे म्हणत आहेत.

जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

१३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे इंडिपेंडंट सिंगापूरने सांगितले. या घटनेचा व्हिडीओ @OnlyBangersEth या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.

लोकांच्या लक्षात आले की, तरुणी कारला धडकल्यानंतर लगेचच तिने तिचा मोबाइल तपासला. यावरून अनेकांनी अशा परिस्थितीत कारमध्ये डॅशबोर्ड कॅमेरा असणे किती महत्त्वाचे असू शकते याकडे लक्ष वेधले.

घराबाहेर पडल्यानंतर मोबाईल हातात ठेवू नका, अपघाताच्या घटनेवर युजर्सच्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले की, “गंभीर जखमी झाल्यानंतर तिची कृती म्हणजे मोबाइल शोधणे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “हा वेडेपणा आहे, जखमी झाल्यानंतर कोण आधी मोबाइल शोधण्याचे काम करतं.” तिसऱ्याने लिहिले की, “जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून किंवा कोणत्याही ठिकाणाहून बाहेर पडता तेव्हा मोबाइल हातात ठेवू नये, हा एक नियम आहे जो तुम्हाला रस्त्यावर सुरक्षित ठेवेल. मोबाइल हातात घेणे अगदी आवश्यक असल्यास, चालणे थांबवा आणि त्याचा वापर करा.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking road accident in singapore car hits woman distracted by phone what she did next shocked internet sjr