Shocking video: अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर पिसाळलेला भलामोठा हत्ती दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते हे उघड आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हत्ती हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तुम्ही आपलं काम करा मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगतो. शिवाय हत्ती हा फारच बुद्धीशील प्राणी असल्यामुळे माणसांसोबतही त्याचं चांगलं पटतं.मात्र हत्ती जो पर्यंत शांत आहे तो पर्यंत सर्वकाठी ठीक. पण एकदा का त्याला राग आला की मग काही खरं नाही.त्याच्या क्रोधापुढे अख्खं जंगल थरथरतं. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अरहळ्ळी गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. यात एका जंगली हत्तीने दोन माणसांचा पाठलाग केला आणि त्यांना काही अंतर धावायला लावलं. व्हिडिओमध्ये दिसणारे दोन्ही पुरुष वनविभागाचे कर्मचारी आहेत, जे एका हत्तीला वाचवण्यासाठी गेले होते. हत्ती जंगलातून भरकटून गावातील शेतात पोहोचला होता. त्यानंतर कर्नाटक वनविभागाच्या इमर्जन्सी टास्क फोर्सचे कर्मचारी हत्तीला परत जंगलात पाठवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, दुसऱ्या एका हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन्ही कर्मचाऱ्यांचा पाठलाग सुरू केला. कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढून कसाबसा जीव वाचवला. एक सेकंद जरी त्यांना उशीर झाला असता पळायला तर ते दोघेही हत्तीच्या पायाखाली चिरडले असते. हत्तीचं हे रौद्र रूप पाहून तुमच्याही मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडीओ

हत्ती हा जगातील अतिशय विशाल प्राणी आहे. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावासाठी तो ओळखला जातो. तो कोणाला विनाकारण त्रास देत नाही मात्र एकदा का तो पिसाळला की संपूर्ण सृष्टी हलवून टाकतो. हा व्हायरल व्हिडिओ @RohitNandanMis3 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “यामुळेच प्राण्यांना कधीही त्रास नाही दिला पाहिजे”.

Story img Loader