Viral video: अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर एका शिक्षक आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. शिक्षिकेनं एका विद्यार्थीकडून तिच्या मोबाईल फोन काढून घेतला. कारण ती वर्ग सुरू असताना मोबाईल वापरत होती. आता अशा स्थितीत आपण काय विचार करू? शिक्षकांची माफी मागून मोबाईल परत मिळवण्याचा प्रयत्न करूया. पण ही विद्यार्थीनी फारच धीट निघाली. तिनं थेट चप्पल काढली आणि थेट शिक्षिकेला मारहाण केली.

ही घटना आंध्र प्रदेशमधील रघु इंजीनियरिंग कॉलेजमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. एक तरुणी शिक्षिकेचा पाठलाग करत त्यांच्याकडून आपला मोबाईल फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतेय. अर्थात शिक्षक काही पहिल्याच विनंतीमध्ये मोबाईल परत देणार नाहीत. अशा वेळी थोडं संयमानं, थोडी माफी मागून, शिक्षकांनी बोलावं लागतं. पण तरुणी अजिबात नम्रपणा दाखवत नव्हती. तिनं पायातली चप्पल काढली अन् ती थेट शिक्षिकेवर तुटून पडली.चपलेनं शिक्षिकेला मारहाण केली. दरम्यान शिक्षिकेनं देखील प्रतिहल्ला केला पण तोपर्यंत तिनं शिक्षिकेला खूप मारहाण केली होती.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे जरा तरी भान ठेवा” तर आणखी एकानं कॉलेजमधून तरुणीला काढून टाकण्याची मागणी केलीय.