Shocking Stunt Video : लोक हल्ली रील्सवर फेमस होण्यासाठी वाटेल त्या थराला जाताना दिसतात. एका एका व्हिडीओला लाखो व्ह्युज, कमेंट्स मिळवण्याच्या लोभापायी ते स्वत:चा जीव धोक्यात घालतानाही विचार करत नाहीत. कधी कधी तर असे काही रील व्हिडीओ व्हायरल होतात, की पाहून काळजात धडकी भरते, राग अनावर होतो. सध्या ट्रेनमधील एका तरुणीचा असाच एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तरुणीने धावत्या ट्रेनमध्ये रीलसाठी असे काही कृत्य केलं की पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तरुणीला खडेबोल सुनावले आहेत. व्हिडीओत तरुणी जीव धोक्यात टाकून धावत्या ट्रेनच्या गेटमध्ये एका तरुणाचा हात पकडून लटकत उभी राहते.
रीलसाठी तरुणीचा जीवाशी खेळ
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रीलसाठी कशाप्रकारे आपल्या जीवाशी खेळतेय, तरुणी धावत्या ट्रेनच्या गेटमध्ये एका तरुणाचा हात धरून बाहेर डोकावून उभी राहते. ट्रेनच्या बाहरे डोकं करून ती काही डान्स स्टेप्सही करते. तरुणी ज्या स्थितीत उभी आहे, त्या स्थितीत तिच्याकडून थोडीशी जरी चूक झाली तर ती तिच्या जीवावर बेतू शकते. पण, कसलाही विचार न करता ती हे जीवघेणं कृत्य करतेय. तरुणीचे धावत्या ट्रेनमधील हे जीवघेणं कृत्य पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, एक चूक आयुष्यात किती भारी पडू शकते हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळू शकेल.
“आता रेल्वे पोलिस कुठे आहेत?” युजरचा सवाल
ट्रेनमधील तरुणीच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ @Saiba_19 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणीला चांगलेच सुनावले आहे. एका युजरने लिहिले की, “चुकूनही मधे ती एका खांबाला धडकली असती तर गेम ओव्हर होता.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “आता रेल्वे पोलिस कुठे आहेत?” तर काहींनी हा व्हिडीओ पाहून बजावले की, “प्लीज, असे करू नका.”