Shocking Stunt Video : सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक भयानक, जीवघेणे स्टंट करताना दिसतात. विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हेच अशा लोकांचे लक्ष असते. पण, या स्टंटबाजीत आपल्याला जीव गमवावा लागू शकतो किंवा गंभीर दुखापत होऊ शकते याबाबत कसलाही विचार हे स्टंटबाज करीत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात त्याने लायटर घेऊन असा काही स्टंट केला आहे की, ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल. कारण- या स्टंटबाजीत चक्क त्याचा संपूर्ण चेहऱ्याला आग लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

… अन् क्षणार्धात चेहऱ्याने घेतला पेट

लहानपणी तुम्हालाही लायटरबरोबर खेळ करू नका, असे घरातल्या मोठ्या व्यक्तींनी तुम्हाला बजावले असेल. कारण- लहानसा लायटर चुकूनही फुटला किंवा तुटला आणि आगीच्या संपर्कात आला, तर मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी म्हणून लहान मुलांच्या हाती लायटर येणार नाही याची काळजी घेतली जाते. पण, काही मोठी मुलं लहान मुलांप्रमाणे लायटरसोबत स्टंट करताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओतही एक तरुण चक्क दातांनी लायटर तोडण्याचा प्रयत्न करतोय. एका हाताने तो लायटर तोंडात पकडून तोडतोय आणि दुसऱ्या हातात त्याने पेटते लायटर धरून ठेवलेय. त्याच्या तोंडातील लायटर तुटताच दुसऱ्या हातातील जळत्या लायटरमुळे ते मोठा पेट घेते आणि मोठी आग लागते. मग ही आग क्षणार्धात त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरते. आग पाहून तरुणही घाबरतो; पण काही सेकंदांत ती विझते.

त्यानंतर पुन्हा तो कॅमेऱ्यासमोर येतो आणि चेहऱ्यावर कुठे भाजले नाही ना हे तपासतो. पण चेहऱ्यावर कुठेही त्याला फारशी जखम झाली नाही. फक्त ओठाच्या एका बाजूला त्याला भाजते. त्यामुळे ती जागाच फक्त भाजल्यामुळे काळी दिसत होती. पण, अशा प्रकारचा स्टंट तरुणाच्या चांगलाच जीवावरदेखील बेतू शकला असता.

अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या तरुणाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे; तर काहींनी व्हिडीओ पाहून भीती व्यक्त केली आहे. काही जण तरुणाच्या तब्येतीबाबत विचारणा करीत आहेत. एका युजरने लिहिले, “घोस्ट रायडर बनण्यासाठी खास ट्युटोरियल.” दुसरा युजरने लिहिले, “देवाने याला जीवन दिले आहे.” तिसऱ्याने लिहिले, “घोस्ट रायडरच्या पुढच्या भागात या तरुणालाच घ्या.”