गाडी चालवताना चालकाने खूप दक्ष असावं लागतं. त्यातून महामार्गावर गाडी चालवताना अधिकच दक्ष असणं गरजेचं आहे, कारण येथे एक छोटीशी चूकही अनेकांच्या जीवावर बेतू शकते, याचंच ताजं उदाहरण चीनच्या महामार्गावर पाहायला मिळालं. एका महिलेच्या क्षुल्लक चुकीमुळे बसमधल्या अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता . सुदैवाने प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
सौंदर्याने घात केला; अधिकाऱ्याने विमानतळावरच अडवले
चीनमधील एक महिला आपली कार चालवत होती. तिच्या गाडीपासून काही दूर अंतरावर प्रवासी बस धावत होती. यावेळी महिलेला तहान लागली. आपली गाडी बाजूला पार्क करून पाणी पिण्यात वेळ घालवण्यापेक्षा गाडी चालवता चालवता पाणी पिण्याचा विचार तिच्या मनात आला. या नादात तिचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. तिची गाडी पुढे चालणाऱ्या बसवर जाऊन आदळणार होती. एवढ्यात प्रसंगावधान दाखवत बसचालकाने आपली बस बाजूला घेतली. पण तिला वाचताना त्याचाही बसवरचा ताबा सुटला आणि बस एका बाजूला कलंडली. यावेळी बसमधले अनेक प्रवासी झोपेत होते. पणं सुदैवाने सीटबेल्ट बांधल्याने प्रवाशांना गंभीर इजा झाली नाही.
मालिकेचा सेट नव्हे, हा तर आध्यात्मिक गुरूंच्या मुलीचा लग्नमंडप
अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार बसमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या अपघातात सात जण जखीम झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून आपल्या क्षुल्लक चुकीमुळेच हा अपघात झाला असल्याचे तिने कबूल केलं.