एका विचित्र घटनेत, थायलंडमधील दोन कामगार एका इमारतीच्या २६ व्या मजल्यावर लटकत असताना एका रहिवाशाने दोघांना आधार देणारी दोरी कापली. NBC च्या रिपोर्टनुसार, रहिवासी रागावली होती कारण तिला सुरू असलेल्या कामाची माहिती दिली गेली नाही.या घटनेच्या व्हिडीओमध्ये दोन कामगार उंच इमारतीच्या बाहेर लटकलेले दिसत आहे. याच वेळी एक महिला त्यांची दोरी कापते. या घटनेनंतर, आधार देणारी दोरी कापून टाकणाऱ्या महिलेवर आता हत्येचा प्रयत्न आणि मालमत्ता नष्ट केल्याचा आरोप आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

या महिलेला दोरी कापण्यास कशामुळे प्रवृत्त केले हे स्पष्ट नसले तरी, स्थानिक बातम्यांनुसार, जेव्हा तिने दोन कामगारांना तिच्या घराबाहेर पाहिले तेव्हा ती यासंदर्भात माहिती नसल्याने ती निराश झाली होती.एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारचा नागरिक असलेल्या सॉन्ग नावाच्या कामगारांपैकी एकाने थाई मीडियाला सांगितले की, तो इमारतीतील तडा दुरुस्त करण्यासाठी ३२ व्या मजल्यावर सहकारी कामगारांसह लटकत होता. तथापि, जेव्हा ते 30 वर पोहोचले तेव्हा त्याला दोरी जड होत असल्याचे जाणवले आणि त्याने खाली पाहिले तेव्हा त्याला २१ व्या मजल्यावर कोणीतरी दोरी कापताना दिसले, असे अहवालात नमूद केले आहे.

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

कामगाराची प्रतिक्रिया

त्यांना मदत करण्यासाठी इतर कोणतेही युनिट नसल्यामुळे कामगार २६ व्या मजल्यावर लटकत होते. “ही घटना धक्कादायक आहे आणि ती अजिबात घडू नये,” कामगारांना वाचविण्यास मदत करणारे रहिवासी प्रफईवान सेटिंग यांनी न्यूज वेबसाइटला सांगितले की, तिच्या पतीने एका पेंटरला मदतीसाठी इशारा करताना पाहिले.

( हे ही वाचा: “पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! )

या घटनेमुळे तपास सुरू झाला त्या ३४ वर्षीय महिलेने, प्रथम दोरी कापली असल्याचा नकार दिला, नंतर सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुरावे दाखविल्यानंतर तिने कबुली दिली. पण तिने कामगारांना मारण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले,असे बातमीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking the woman cut the rope the worker was hanging out on the 26th floor ttg