Canada viral video: कामाच्या चांगल्या संधी, आकर्षक पगाराचे पॅकेजेस आणि उत्तम जीवनशैली यांमुळे सध्याच्या तरुणाईचा परदेशांतील नोकऱ्यांकडे अधिक कल आहे. मात्र, परदेशांत जाणे आणि तिथे उदरनिर्वाह करणे तितकेसे सोपे नाही. कारण- नोकरीच्या शोधात परदेशांत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भारतातील तरुण कॅनडाला जाऊन भरपूर पैसा कमवून सेटल होण्याची स्वप्ने पाहत असतात. कॅनडामध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहत आहेत. पण परदेशात त्यांना चांगली नोकरी किंवा भरपूर पैसा मिळेलच असे नाही. बऱ्याचवेळा चांगली नोकरी मिळत नाही. अशीच काही भीषण वास्तव सांगणारी घटना कॅनडातून समोर आली आहे. कॅनडामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दोन दिवसांत ३००० हून अधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, यातील बहुतांश लोक हे भारतीय आहेत.

कॅनडातील तंदूरी फ्लेम रेस्टॉरंटच्या बाहेरील हा व्हिडिओ आहे. नोकरी शोधताना भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे या व्हिडीओतून समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जर कॅनडाला जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमचीही झोप उडेल.

या व्हिडिओमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी नोकरीसाठी रांगेत उभे राहताना दिसत आहे. कॅनडामधील ही नोकरी वेटरच्या पदासाठी आहे. विद्यार्थ्यांनी ही रांग मुलाखतीसाठी लावली आहे. पण इतका वेळ रांगेत उभे राहून सुद्धा त्यांची मुलाखत घेण्यात आली नाही. म्हणून त्यांनी या गोष्टीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये शिक्षणाबाबतीत आणि नोकरीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या या विद्यार्थ्यांची अवस्था पाहवत नाहीये. त्यापेक्षा आपण भारतातच बरे होतो, असे यांना यावेळी नक्की वाटत असेल. कॅनडामध्ये स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य आणि नंतर नागरिकत्व मिळवणे अगदी सोपे झाले आहे. मात्र, येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला जाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” चिमुकल्यांचा संघर्ष पाहून कळेल आई-वडिलांचं असणं किती गरजेचं

@MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना,“बॅम्प्टनमध्ये नवीन रेस्टॉरंट उघडण्याच्या जाहिरातीनंतर ३००० विद्यार्थी (बहुतेक भारतीय) वेटर नोकरीसाठी रांगेत उभे असताना कॅनडातील भितीदायक दृश्ये. कॅनडामध्ये प्रचंड बेरोजगारी? गुलाबी स्वप्ने घेऊन भारत सोडून कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गंभीर आत्मपरीक्षणाची गरज आहे!” असं कॅप्शन लिहलं आहे.