Pepsi making shocking video: पॅप्सी हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. पॅप्सी खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. अनेक फ्लेवरमध्ये पॅप्सी तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. मात्र तरीही पॅप्सी सगळ्यांचीच फेव्हरेट, कारण कमी पैशात ती जास्त गारवा देते. दरम्यान हीच पॅप्सी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते, हे पाहिलत तर पुन्हा हातही लावणार नाही. पॅप्सी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून तुमचीही झोप उडेल..
व्हायरल व्हिडीओ एक रुपयाची पॅप्सी बनविण्याच्या कारखान्यातील आहे. पहिल्यांदा गॅसवर एक मोठं पातेलं ठेवण्यात आलं आहे. त्यात पाणी आणि साखर घातली आहे. त्यानंतर साखर विरघळण्यासाठी ते द्रावण चमच्यानं हलवण्यात आलं आहे. त्यानंतर या भांड्यात एक यंत्र घालून मिश्रण एकजीव केलं जात आहे. त्यानंतर ज्या फ्लेवरची पॅप्सी बनवायची आहे तो फूड कलर टाकून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव केलं जात आहे आणि थोडं पाणीसुद्धा वरून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर पुन्हा यंत्राच्या साह्यानं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं जात आहे. मात्र हे सगळं करताना आजूबाजूला इतकी घाण आहे की
हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ eatwithdelhi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी स्वच्छतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका वापरकर्त्याने लिहिले, आपल्या आरोग्याचं खूप अवघड आहे. दुसऱ्या वापरकर्त्यानं “आता लहान मुलांचा जीव घेणार का?” अशा संतप्त सवाल केलाय. तर आणखी एकानं, लहान मुलांना हे खायला देऊ नका असं आवाहन केलंय.