Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून थरकाप उडतो. कधी अपघाताचे तर कधी हत्येचे व्हिडीओ तर पाहावेसे वाटत नाही. अपघाताचे व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून आपण स्तब्ध होतो.
सध्या असाच एक जिममधील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिममध्ये एक तरुण बारबेल उचलून वर्कआउट करताना दिसत आहे. पुढे या तरुणाबरोबर असे काही होते की तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत दिसेल की १०० किलो वजनाचा बारबेल या तरुणाच्या गळ्यावर पडतो. पुढे जे काही होते, ते पाहून अनेक जण बारबेल सुद्धा उचलण्यास घाबरतील.
हल्ली तरुणाईमध्ये जिमविषयी खूप वेड दिसून येते. तरुण मुले मुली जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात पण जिममध्ये वर्कआउट करताना तुमच्या बरोबर जिम ट्रेनी असणे आवश्यक आहे. जिम ट्रेनी आपल्याला वर्कआउट करताना मार्गदर्शन करतो. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की जिम ट्रेनीच्या गैरहजरीत या तरुणाला वर्कआउट करणे चांगलेच महागात पडले.
हा व्हायरल व्हिडीओ एका जिममधील आहे. एक तरुण जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. तो बारबेल उचलून वर्कआउट करताना दिसत आहे. तो बेंचवर झोपून बारबेल उचलताना दिसतोय पण अचानक त्याच्या हातून बारबेल सुटतो आणि त्याच्या गळ्यावर पडतो. १०० किलो वजनाचे बारबेल गळ्यावर पडल्यावर त्याला ते उचलता येत नाही.तो खूप प्रयत्न करतो पण त्याला अपयश येते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचा गुदमरुन नंतर मृत्यू होतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईन.
हेही वाचा : धक्कादायक! नवरा-बायको भांडणाच्या नादात पाचव्या मजल्यावरुन पडले खाली, व्हिडीओ पाहून येईल अंगावर येईल काटा
Last Image या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जिमच्या बेंचवर झोपून 100 किलो वजनाचा बारबेल उचलताना गळ्यावर पडलल्यामुळे गुदमरून तरुणाचा मृत्यू”
हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असेल. जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे वाईट नाही पण काळजीपूर्वक करणे तितकेच गरजेचे आहे.