Shocking video: सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण हसावे की रडावे ते कळत नाही. तर काही व्हिडीओ हे असे असतात की पाहून काळजाचा ठोका चुकतो. सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे जो पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल.
एका पावलानं काय होतं, असा किती फरक पडतो हे तुम्हाला व्हिडीओ पाहून कळेल. जीवन आणि मृत्यूच्यादरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं. जीवन-मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ आहे म्हटले जाते. असे म्हणतात, आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे, कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा मृत्यूशी सामना होतो. काही जण मृत्यूच्या दारातून परत येतात. अनेकांचे असे अनुभव आपल्याला नेहमीच ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दरम्यान, अशाच एका क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडरचा नट उघडत आहे आणि यादरम्यान तो सिलिंडरचा संपूर्ण नट उघडतो आणि स्फोट होताच एका सेकंदात पाऊल मागे टाकतो. हा सिलिंडर रॉकेटच्या वेगाने बाहेर जातो आणि समोरच्या दुकानाची भिंत तोडून आत शिरतो. मात्र, या काळात व्यक्ती क्षणात मागे गेल्यानं त्याच्यासोबत कोणताही अपघात होत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही या व्यक्तीचा निष्काळजीपणाही पाहू शकता की, समोर एक वाहन उभे आहे आणि त्यासोबत इतरही सिलिंडर ठेवलेले आहेत, तरीही तो निष्काळजीपणे सिलिंडरचा नट उघडत आहे. या निष्काळजीपणामुळे त्याचा जीवही गेला असता. आयुष्यात एका सेकंदाची किंमत काय विचारणाऱ्यांना हा व्हिडीओ बघून कळेल की आयुष्यात एका सेकंदाची किंमत किती आहे..
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @devgodara34 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ६ लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. युजर म्हणत आहेत की, इतकेही धाडस चांगले नाही की, जीवही जाऊ शकतो. प्रत्येकानं स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.
© IE Online Media Services (P) Ltd