Monkey attacked on Girl: सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ प्राण्यांचे असतात. आता जंगलातील प्राणीदेखील मानवी वस्तीत वावर करताना दिसून येतात. काही जंगली प्राण्यांमुळे मानवी वस्तीत आता भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. फिरता फिरता प्राणी कधी हल्ला करतील याचा काही नेम नाही. हल्ल्याचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. अशातच माकडाच्या एका जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त ज्या प्राण्यांचा शहरी लोकांना सर्वाधिक त्रास होतो ती म्हणजे माकडे. लोकांच्या घरात घुसून, त्यांच्या सामानाची नासधूस करणे आणि अन्नपदार्थ खाणे हे त्यांच्यासाठी सामान्य आहे. साधारणतः एक किंवा दोनच माकडे येतात. पण, नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये या भल्यामोठ्या माकडाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. हा व्हिडीओ पाहू तुमचाही थरकाप उडेल.
पायाचे लचके तोडल्याने कोसळली तरुणी अन्..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एक तरुण जाताना दिसत आहे. त्याच्यामागोमागच एक तरुणी तिथून येते. तेवढ्यात एक भलंमोठं माकड तिच्या मागे येतं आणि तिच्यावर हल्ला करतं. ते माकड त्या तरुणीचा पाय पकडतं आणि पायाचे लचके तोडतं. त्यामुळे ती तरुणी जमिनीवर कोसळते. यावेळी त्या तरुणीनं स्वत:च्या बचावासाठी आरडाओरडा करताच ते माकड पळून जातं आणि मग तरुणी तिथून पळ काढते. हा भयानक हल्ला तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या ठिकाणी मोठी व्यक्ती होती. त्यामुळे ती थोडक्यात बचावली; मात्र जर एखादं लहान मूल असतं. तर मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> झोमॅटोवरून मागविलेल्या जेवणात आढळली धारदार वस्तू; Photo पाहिलात तर पुन्हा कधीच बाहेरचं जेवण खाणार नाही
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हटलंय, “बापरे! हे खूप भीतीदायक आहे.” तर, दुसरा युजर म्हणतो, “आशा करतो की, तरुणी आता बरी असेल.”
माकडांकडून माणसांवर हल्ले होण्याची घटना देशभरात विविध ठिकाणी घडत असतात. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यातील राजगढ शहरात माकडांनी उच्छाद मांडला होता. माकडांनी जवळपास दोन आठवडे शहरात धुमाकूळ घातला होता. इतकेच नव्हे, तर त्यांनी अनेक नागरिकांवरही हल्ला केला होता; ज्यामध्ये अनेकांना गंभीर जखमा झाल्या होत्या.