Viral video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले. ट्रॅफिक पोलिसांचे अने किस्से आपण ऐकले आहे. सोशल मीडियावरदेखील अनेक नागरिकांनी शेअर देखील केले आहेत. चुकीच्या गोष्टींवर लगाम घालणं आणि शिक्षा करण्याचं काम खाकीचं असतं मात्र काही असे महानग असतात जे नियमांचं उल्लंघन करत पोलिसांशी वाद घालतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रॅफिक पोलीसानं नियम तोडल्याबद्दल त्याला दंड ठोठावला.पण हा तरुण दंड भरण्यास तयार नाही. उलट तो पोलिसांनाच धमकी देऊ लागला. म्हणाला, मी एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तू SP ला बोलाव तरी देखील मी घाबरणार नाही. शेवटी दादागीरी दाखवणाऱ्या या तरुणाचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा या प्रकरणात खरी चूक कोणाची आहे?

ही घटना उत्तर प्रदेशमधील बागपत या ठिकाणी घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रॅफिक पोलीसानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका बाईकस्वाराला पकडलं आहे. बाईक चालवताना त्यानं हेल्मेट घातलेलं नाही. त्यामुळे पोलीसानं त्याला दंड ठोठावला. पण शांतपणे आपली चूक मान्य करून दंड भरण्याऐवजी तो तरुण उलट पोलिसांवरच दादागीरी करू लागला. “मी दंड भरणार नाही, तू SP ला बोलाव. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी बिझसेनमॅन आहे. माझ्या खूप मोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत. तुला बघतोच मी.” अशाप्रकारे तो पोलीसासोबत भांडू लागला. आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत.