Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर, असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अगदी थरकाप उडवणारे असतात. सोशल मीडियावरील अपघाताचे व्हिडीओ अनेकदा धक्का देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क पाचव्या मजल्यावरुन एक जोडपे (नवरा-बायको) खाली पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ पाहून आता तुम्हाला वाटेल हे जोडपे पाचव्या मजल्यावरुन कसे पडले असावे? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलनीतील रस्त्यावरचा आहे. रस्त्यावरुन तीन तरुण मुले जाताना दिसतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अचानक रस्त्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमधून खाली महिला आणि पुरुष पडतात आणि एकच थरकाप उडतो. या तीन तरुणांना हे महिला पुरुष जवळपास धडकतात. इमारतीतून कुणीतरी खाली पडलेले आहे, हे पाहून ते तरुण मुले सुद्धा घाबरतात आणि थोडे दूर होतात. पण नंतर नेमके काय घडले आणि कोण पडले हे बघण्यासाठी हे मुले जवळ येतात आणि आजुबाजूला राहणारे कॉलनीतील इतर लोकही जमा होतात.
हेही वाचा : हीच खरी माणूसकी! जेसिबीच्या साहाय्याने वाचवला कुत्र्याची जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल
इमारतीतून खाली पडलेले हे महिला पुरुष पती पत्नी होते. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन ते पडले. या व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे पाचव्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये भांडण करत होते आणि भांडता भांडता चुकून खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हे जोडपे चुकून पडले. भांडणाच्या नादात त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागले. पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर या जोडप्याचा जीव वाचला की नाही, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Last Image या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत एक जोडपे भांडताना चुकून खाली पडले आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणांवर धडकले.”