Dog Attacks Girl video: गेल्या काही दिवसांमध्ये कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशातचं एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांनी केलेल्या एका भयानक हल्ल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रस्त्यावर खेळणाऱ्या एका निष्पाप ४ वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात कुत्र्यांनी मुलीच्या हातांचा चावा घेतला आणि नंतर तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. घटना फार वेदनादायी असून यातील दृश्ये कुणाच्याही अंगावर काटा आणतील. आपल्यावर झालेल्या हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवायचे ते चिमुकलीला समजत नाही आणि ती जोरजोरात रडू लागते. श्वानांचा ग्रुप मात्र तिला फरफटत पुढे घेऊन जाऊ लागतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली घराबाहेर आहे अचानक तिकडे दोन कुत्रे येतात आणि चिमुकलीवर हल्ला करतात. व्हिडिओमध्ये दिसून येते की, कुत्र्याने मुलीवर कसा हल्ला केला आणि तिला ओरबाडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये अक्षरश: हा मुलगी खाली कोसळतो. चिमुकली स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आजूबाजूला यावेळी मदतीसाठीही कुणी पुढे येताना दिसत नाहीये. मात्र नशीब बलवत्तर म्हणून यावेळी एक महिला तिथे येते आणि चिमुकलीला कुत्र्‍याच्या तावडीतून वाचवते.

पाहा व्हिडीओ

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात. व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळ व्यक्त करत आहेत, एकानं म्हंटलंय, “बापरे किती वेदना झाल्या असतील तिला”