Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. मालगाडी जात असल्याने रेल्वे फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याच्या नादात एका विद्यार्थिनीने जीव गमावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.
हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून नागरिकांना आणि वाहनांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही काही लोक तेथे न थांबता, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हेच पाहून ही तरुणीदेखील रुळ ओलांडायला जाते आणि अपघात होतो. हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून नागरिकांना आणि वाहनांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही काही लोक तेथे न थांबता, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हेच पाहून ही तरुणीदेखील रुळ ओलांडायला जाते आणि अपघात होतो. बऱ्याच वेळा अशा घटना घडतात तरीही लोक यातून धडा घेत नाहीत. मालगाडी जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद होतं. यावेळी बाईक, कार फाटकाच्या आधी थांबलेल्या होत्या. याचदरम्यान एक विद्यार्थिनी फाटकाखालून वाकत घाईत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करते. पण ती रुळ ओलांडत असताना काही सेकंदाचा उशीर होतो आणि आपला जीव गमावते. ती काही हालचाल करण्याआधीच मालगाडी तिला उडवते. यावेळी मालगाडीचा धडक विद्यार्थीनीला इतकी जबरदस्त बसते की तिचा जागीच मृत्यू होतो.
पाहा व्हिडीओ
बऱ्याच वेळा अशा घटना घडतात तरीही लोक यातून धडा घेत नाहीत.शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.