Shocking Video : सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. अशात घराबाहेर पडताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विशेषत: पुरग्रस्त ठिकाणी अत्यावश्यक सावधगिरी बाळगणे, महत्त्वाचे आहे पण तरीसुद्धा काही लोकं नको ते धाडस करतात आणि मग जीवावर बेततं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ओसंडून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जीप वाहताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार.
अनेकदा अति पावसामुळे नद्या नाल्यांना पुर येतात आणि रस्ता किंवा पुलावरुन पाणी ओव्हर फ्लो होते. अशावेळी अनेक अपघात घडण्याची भीती असते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल अशीच एक जीप ओसंडून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही जीप माणसांनी गच्च भरलेली आहे. ड्रायव्हरला वाटते की आपण पुरातून रस्ता ओलांडून गाडी बाहेर काढू शकतो पण ड्रायव्हरचे हे धाडस सर्व लोकांच्या जीवावर बेतले. ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात हा ड्रायव्हर गाडी उतरवतो आणि पुराच्या पाण्याच्या मधोमध गाडीचा तोल जातो. ड्रायव्हरसह २०-२५ लोक वाहून जातात. हा व्हिडीओ पाहून कुणालाही धक्का बसेल.
यापूर्वी अशीच घटना नागपूर येथे सुद्धा घडली होती. असेच विनाकारण धाडस केल्यामुळे स्कॉर्पिओ वाहून गेली होती. आता ही जीप वाहून गेली.
seema.sirvi या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी ड्रायव्हर आणि जीपमध्ये बसणाऱ्या लोकांना दोष दिला आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा निष्काळजीपणा आहे, पुलावरुन पाणी ओव्हर फ्लो होत असताना पूल ओलांडू नये” तर एका युजरने लिहिले, “अशी चुक कधीही करू नये.”