Viral video: काही दिवसांपासून हिट ॲण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट ॲण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणुसकीला काळिमा फासणारे असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कोणी जमिनीसाठी भावाचा खून करतो, कोणी हुंड्याच्या लोभापोटी पत्नीचा छळ करतो, तर कोणी बायकोला वैतागून आत्महत्या करतात. तर कोणी दारु पिऊन गाडी चालवत एखाद्या निष्पापाचा बळी घेतो. अशातच माणुसकीला लाजवेल अशी आणखी एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका स्कूटरवरून चालणाऱ्या एका तरुणीने पायी चालत जाणाऱ्या महिलेला धडक दिली आणि नंतर नकळत तेथून पळ काढला. अपघातात महिला जखमी झाली आहे किंवा तिची प्रकृती कशी याची साधी विचारपूसही न करता या तरुणीने पळ काढला.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंडोनेशियातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे एका स्कूटरवरून चालणाऱ्या एका मुलीने मुख्य रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला समोरून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ती महिला रस्त्यावर पडली आणि वेदनेने ओरडू लागली.त्यानंतर स्कूटरवरून आलेल्या मुलीने काही सेकंद त्या महिलेकडे पाहिलं आणि तिला काहीतरी चांगलं-वाईट बोलून तिथून निघून गेली. तिनं पीडितेची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. अपघाताची ही संपूर्ण घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ

महिलेला धडक देऊन पळून गेल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हजारो लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे आणि अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले… आज मला एक गोष्ट कळली, पापाच्या परी प्रत्येक देशात आढळतात. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…अशा महिलांचा वाहन चालवण्याचा अधिकार काढून घेतला पाहिजे. तर दुसऱ्या युजरने लिहिले… महिला मदत करण्यासाठी थांबली असती तर ती फसली असती, म्हणून ती पळून गेली.