Viral Video : सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोक फेमस होण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीने स्टंट करण्याच्या नादात स्वत:ला पेटवून घेतले. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ जुना आहे; पण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीने आगपेटीतील काडी पेटवली आणि आगीचा भडका उडाला. आगीने शरीराभोवती विळखा घातल्यानंतर या व्यक्तीने अगदी जवळच असलेल्या नदीत उडी मारली. हा संपूर्ण प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हेही वाचा : Viral Video : छोट्या कार्ट्यांचा तुफान डान्स! त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन
@ExtremeFaiIs या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओची निंदा करत स्टंट करणाऱ्या व्यक्तीला खडे बोल सुनावले आहेत.
यापूर्वीही सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. फेमस होण्याच्या नादात किंवा ‘हटके व्हिडीओ’ बनविण्याच्या नादात असे जीवघेणे स्टंट करणे हे खूप चुकीचे आहे.