Viral video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही या व्यक्तीच्या नशिबावर हळहळ व्यक्त कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. अशातच एका बैलाचं भलं करायला गेलेल्या व्यक्तीवरच बैलानं हल्ला केलाय. असे अनेकदा घडते की आपण चांगल्या मानाने काही करायला जातो पण घडते काही वेगळेच. अनेकदा असेही होते की दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करताना मात्र आपल्यासोबतच काहीतरी वाईट घडून बसते. अशात बरेचजण आपल्या नशिबाला दोष देतात. या व्हायरल व्हिडिओतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. जिथे एक व्यक्ती बैलाच्या चांगल्यासाठी तिची मदत करू पाहतो मात्र ही बैल त्याच्यासोबत असे काही करते की पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.

करायला गेला एक पण घडलं भलतंच!

व्हिडिओत बघू शकता की, एक नदी किनारी एक बैल उभा आहे. ज्याच्या शिंगामध्ये एक धागा अडकला आहे. एका व्यक्तीला हे दिसतं आणि तो बैलाची मदत करण्यासाठी समोर येते. तो आरामात बैलाच्या शिंगांमध्ये अडकलेला धागा काढतो. पण असं केल्यावर बैल संतापतो आणि व्यक्तीवर हल्ला करतो. काही सेकंदानं बैल शिंगानं वार करतो, ज्यामुळे व्यक्ती पाण्यात पडते

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Memes4Grind नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “ज्याचं करावं भलं को म्हणतोय माझंच खरं” तर आणखी एकानं “भलाई का जमाना नही रहा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.