Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ दर दिवशी व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दर दिवशी अनेक चोरीच्या घटना उघडकीस येतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिरातून देवीचा मुकुट चोरून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (Shocking video a thief stealing crown of Kali Mata from Jeshoreshwari Kali Bangladesh caught on CCTV video goes viral)

मंदिरातून चोरला देवीचा मुकूट; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद ( a thief stealing crown of Kali Mata from Jeshoreshwari Kali )

या व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्हाला एक व्यक्ती शांतपणे मंदिरात शिरताना दिसेल. त्यानंतर ती व्यक्ती हळूच देवीच्या डोक्यावरील मुकुट उचलते आणि पाठीमागे टी शर्ट च्या आतमध्ये लपवते. त्यानंतर ही व्यक्ती मंदिरातून निघून जाते. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना बांगलादेशातील जोगेश्वरी काली मंदिरातील आहे.

हेही वाचा : हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO!

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “म्हणूनच मला मुंबई आवडते… ” बॅगमधून डोकावणाऱ्या मिन्नीला पाहून प्रवासी झाले खूश; VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” एक चोर बांगलादेशातील सातखीरा येथील जेशोरेश्वरी काली मंदिरातून काली मातेचा मुकुट चोरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “देवाला तरी सोड” आणखी एका युजरने लिहिलेय, “बांगलादेशमध्ये ही गोष्ट खूप साधारण बाब आहे” अनेक युजर्सनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी या चोरावर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मंदिरात चोरीचे प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. कधी मुकुट तर कधी दानपेटी चोरीला गेल्याच्या अनेक घटनांविषयी तुम्ही ऐकले असेल. त्यामुळे मंदिरात सीसीटिव्ही फुटेज लावले जातात आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची पावले उचलली जात आहे.