Shocking video: सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक अशा घटना शेअर केल्या जातात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका महिलेचं डोकं रस काढण्याच्या मशिनमध्ये अडकलं. अन् पुढे या महिलेसोबत काय घडलं हे आता तुम्हीच पाहा.

व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला महिला अगदी मृत्यूच्या दारात होती, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

नुकताच झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती खरी घटना दिसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उसाच्या रसाच्या मशीनमध्ये एका महिलेचे केस अडकले आहेत. हे दृश्य असे आहे की ते पाहूनच आपले हातपाय थरथर कापू लागतील. ही महिलाही प्रचंड घाबरली असून ओरडत आहे. व्हिडिओत एक पुरुष मशीनमध्ये अडकलेली महिलेची वेणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आहे. तुम्ही पाहू शकता की ती व्यक्ती त्या मशिनमधून हळू हळू महिलेची वेणी काढत आहे. खूप प्रयत्नानंतर महिलेची वेणी कशीतरी बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या अपघातात महिलेचा जीव वाचला आणि ती थोडक्यात वाचली.घटनेचा हा थरार तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. 

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sarcasmicbhaii नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.असे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सदैव सावध राहणे. बेसावधतेने वावरणाऱ्या सर्वांना सावधान करणारा हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.