Viral video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यांतून दररोज चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहीत असतील. आता जवळपास प्रत्येक रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे आणि बाजारातील कोणतेही दुकान अशा सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही घटना घडली तरी त्यात सर्व प्रकार कैद होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका चोरानं रस्त्यावर फोनवर बोलत उभ्या असलेल्या महिलेचा मोबाईल खेचून पळ काढला आहे.
सोशल मीडियावरील अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहून लोक हैराण होतात. त्यातील अनेक व्हिडीओ राजधानी दिल्लीतील असतात, जिथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. अशा या राजधानी दिल्लीतील चोरीचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चरांच्या मनातून पोलिसांची भीती पूर्णपणे नाहीशी झाल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होतेय. ही घटना दिल्लीतील गुलाब बाग भागातील असल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला फोनवर बोलत असताना रस्त्यावर येत आहे. यावेळी काळ्या रंगाची बनियन घातलेला एक पुरुष त्या महिलेच्या मागे चालत आहे, जो तिचा मोबाईल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसतेय. यावेळी फोनवर बोलत असलेली ती महिला रस्त्यावर येऊन उभी राहताच मागून येणारा माणूसही तिथेच थांबतो आणि संधी मिळताच तो महिलेच्या हातातील फोन हिसकावून तिथून पळून जातो.
परंतु, महिलेला आपला मोबाईल लंपास केला गेल्याचे लक्षात येण्याआधीच तो चोर पसार होतो. घटनास्थळ पूर्णपणे निर्जन असून, महिलेच्या मदतीसाठी तेथे कोणीही नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे तो भामटा फोन हिसकावण्याची हिंमत दाखवू शकला. चोरीची संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पाहा व्हिडीओ
लूटमारीसाठी बहुतांश चोर महिलांना लक्ष्य करीत आहेत. या वर्षी झालेल्या चोरीच्या अनेक घटनांमध्ये महिलांचा समावेश आहे. महिलांना साडीमध्ये पळणे शक्य होत नसल्यामुळे चोरांना प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे ते महिलांना आपले लक्ष्य करतात. अशा घटनांमध्ये मोबाईल पळवण्याबरोबरच सोनसाखळी चोरीचाही समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत.