Viral Video : सोशल मीडियावर अनेक गड किल्ल्यांवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण गड किल्ल्यांवरील फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल अकाउंटवर शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण गड किल्ल्यावर स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. कधी हा तरुण इकडे तिकडे उडी मारताना दिसतो तर कधी उंच ठिकाणाहून उडी मारताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांना भीतीही वाटू शकते.
गड किल्ले उंचावर असतात त्यामुळे येथे वावरताना काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा गड किल्ल्यांवर सतर्कतेच्या सुचना सुद्धा लिहिलेल्या दिसतात पण तरीसुद्धा काही लोकं जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दिसतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण मुलगा गडावर खाली आणि वर अशा उड्या मारताना दिसत आहे. त्यानंतर हा तरुण गड किल्ल्याच्या उंच टोकावर जाऊन उडी मारतो. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही स्तब्ध व्हाल. काही लोकांच्या अंगावर काटा येईल.
व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये, असा सल्ला दिला आहे. एका युजरने लिहिलेय, “अशा प्रकारची स्टंटबाजी करण्याच्या नादात, अनेकांनी जीव गमावला आहे” तर एका युजरने लिहिलेय, “एवढा धोका कधीही पत्करू नये” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्य खूप मौल्यवान आहे, कृपया जीव गमावू नको”
iabhi.choudhary या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हे अकाउंट या तरुणाचे आहे. त्याच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये तो स्वत: अथलेट असल्याचे सांगतोय. त्याच्या या अकाउंटवरुन या पूर्वी सुद्धा असे अनेक स्टंटबाजी करणारे व्हिडीओ शेअर केले आहेत. सार्वजानिक ठिकाणी अशा प्रकारची स्टंटबाजी करणे चुकीचे आहे. जर व्हिडीओ पाहून काही लोकांनी याचे अनुकरण केले तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे सार्वजानिक ठिकाणी अशी स्टंटबाजी करणे नेहमी टाळावे