Viral Video : असं म्हणतात, दिसतं तसं नसतं. अनेकदा आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो, ज्या खऱ्या नसतात आणि याच आपल्या स्वभावामुळे अनेकदा आपली फसवणूक होते. तुमच्याबरोबर कधी कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे? किंवा समोरचा व्यक्ती फसवत असताना त्याची पोलखोल केली आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण थेट भिकाऱ्याची पोलखोल करतो. नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Shocking Reality Check: Young Man Exposes the Harsh Truth of a Beggar in Viral Video)
तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. त्याच्या जवळ एक हात नसलेला भिकारी येतो आणि त्या तरुणाला पैसे मागतो. तरुणाला त्याच्यावर शंका येतो तेव्हा तो त्याचे शर्ट वर करून पाहतो तर त्याला दिसते की त्याने त्याचा हात आतमध्ये बांधून ठेवला आहे. भिकाऱ्याचं खोटं पकडल्यानंतर तरुणाला हसू आवरत नाही आणि त्यानंतर भिकारी सुद्धा हसताना दिसतो. दिसतं तसं नसतं, हे तुम्हाला या व्हिडीओवरून कळेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “या माणसाचे हसणे मला प्रत्येक वेळी हसवते. मी हा व्हिडीओ १०० वेळा पाहिला आहे.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येईल. तुमच्याबरोबर असे कधी घडले का?
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : काय चूक होती त्याची? कांतारा सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
riteshd_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डाव्या हातानं भीक मागा उजव्या हातात सामान धरा…” तर एका युजरने लिहिलेय, “खरचं हसलो मी पण” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप दु:खी होऊन हसावं लागत आहे.” एक युजर लिहितो, “दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” अनेक युजर्सनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचे म्हणत यातून काही शिकण्याचा सल्ला दिला आहे.