सध्या सोशल मीडियावर चेन्नई (तामिळनाडू) मधील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर स्कूटर चालवायच्या आधी तुमच्या मनात स्कूटरमध्ये साप तर अडकलेला नाही ना? असा विचार येऊ शकतो. कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका स्कूटरच्या हँडलच्या खालच्या भागात जवळपास ७ फूटांचा भलामोठा साप आढळून आला आहे. जो पाहताच अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
खरं तर, सोशल मीडियाच्या या काळात आपणाला कधी कोणता व्हिडीओ पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. कधी घरात तर कधी कारमध्ये साप शिरल्याचे व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील. परंतु आता चक्क स्कूटरमध्ये ७ फुटांचा साप आढळल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण एवढा मोठा साप स्कूटरमध्ये कसा जाऊ शकतो? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका स्कूटरची समोरची बाजू घडलेली दिसत आहे. या स्कूटरच्या आत भलामोठा साप अडकल्याचं पाहायला मिळत आहे. स्कूटरमध्ये वेटोळे घालून बसलेला दिसत आहे. या सापाची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये या अधिकाऱ्यांनी सापाला जंगलात सोडण्यासाठी एका पिशवीत घालतल्याचंही पाहायला मिळत आहे. ही घटना चेन्नईत मिचौंग चक्रीवादळामुळे आलेल्या पुरानंतर उघडकीस आली आहे. पुरामुळे येथील अनेक भागात पाणी साचले होते. याच पुराच्या पाण्यापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी साप स्कूटरमध्ये शिरला असावा असा अंदाज लावला जात आहे.