Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. रोज वेगवेगळ्या घटना समोर येत असतात अशातच मंगळवारी मुंबईत चालत्या ट्रेनच्या महिला डब्यात दारूची रिकामी बाटली फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री ८:३० वाजता टिटवाळा लोकल मस्जिद स्टेशन ओलांडून सँडहर्स्ट रोडकडे जात असताना ही घटना घडली. ही काचेची बॉटल महिलांच्या डब्यात फेकल्यानंतर ती बॉटल पंख्याला लागली आणि फुटली त्याचा काचा सगळीकडे उडाल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून फेकण्यात आलेली बाटली प्रथम पंख्याला लागली आणि नंतर बाटलीचे तुकडे डब्यात विखुरले. बाटलीचा एक तुकडा १८ वर्षीय मुलीला लागला जिचे नाव अमिना खान आहे, परंतु सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ज्या ट्रेनमधून बाटली फेकण्यात आली ती सीएसएमटीकडे जात होती. २९ वर्षीय प्रवाशी प्रणवी बिल्ला हिने तुटलेली बाटली उचलली आणि घटनेची तक्रार करण्यासाठी महिला पोलिस कॉन्स्टेबलकडे गेली. परंतु, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला निराशा व्यक्त करताना सांगतेय की, “मी पोलिसांना कारवाई करण्यास सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही.” प्रवासी आता गाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना आणि अशा वर्तनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा घटनांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क आणि तत्पर असले पाहिजे. सुदैवाने, बाटली थेट कोणत्याही महिला प्रवाशाला लागली नाही, नाहीतर प्राणघातक ठरू शकले असते.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/fpjindia/status/1899495724490060133

२२ वर्षीय महिला पत्रकाराने सांगितले की, “मी महिलांच्या डब्यात बसले होते तेव्हा अचानक एक मोठी दारूची बाटली आत फेकण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण घाबरले. परिस्थिती आणखी वाईट म्हणजे दोन महिला कॉन्स्टेबल तिथे होत्या, तरीही त्यांनी हस्तक्षेप करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी काहीही केले नाही. सुरक्षिततेसाठी सर्व प्रयत्न करूनही, लोकल ट्रेनमध्ये महिला अजूनही असुरक्षित नाहीत. अशा घटनांमुळे निष्पापांचे जीव धोक्यात येऊ शकतात.