Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. त्यातील अपघाताचे व्हिडीओ तर थरकाप उडवणारे असतात. अनेकदा चालकाच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचा जीव जातो. सध्या बस अपघाताच्या प्रकरणावर सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भरधाव वेगाने येणारी सरकारी बस वेळीच ब्रेक मारते आणि एका आजीबाईचा जीव वाचतो. नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. (shocking video an old lady was walking in the middle of the road suddenly a fast running bus was about to hit her)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चूक कोणाची? बसचालक की आजीबाई?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बस दिसून येईल. एका ठिकाणाहून टर्न होताना या बसचा तोल जातो आणि भरधाव वेगाने येणारी बस चक्क रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या आजीबाईच्या अंगावर येते पण तितक्यात बस चालक ब्रेक मारतो आणि आजीबाई थोडक्यात वाचतात. त्यानंतर आजीबाई चांगल्याच रागावतात आणि बसचालकाला खडे बोल सुनावतात. तिथे लोक सुद्धा जमा होतात आणि बस चालकाला सुनावताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी कोणाच्याही अंगावर काटा येईल. नेमकी चूक कोणाची, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

manoharhandpost या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पूर्णपणे महिलेची चूक आहे. ड्रायव्हर समजूतदार निघाला म्हणून त्याने वेळीच बस थांबवली” तर एका युजरने लिहिलेय, “महिलेची चूक होती, चालकाला दोष देणे थांबवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “चालक देवाचं रुप होतं म्हणून महिला वाचली” एक युजर लिहितो, “असं रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे कोण चालतं?” काही युजर्सनी चालकाची चूक असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी आजीबाईची चूक असल्याचे लिहिलेय.