Shocking video: वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. जंगलामध्ये अनेक प्राणी असतात. ज्यामध्ये काही भयानक, धोकादायक प्राणी असतात. ते कधी कोणावर हल्ला करतील याचा काही नेम नसतो. सोशल मीडियावर अशा भयावह प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असे प्राणी दबक्या पावलांनी येऊन कधी हल्ला करतील कोणीच सांगू शकत नाही. असाच एक पाणघोड्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आलाय. सगळ्यांनाच माहिती आहे की, पाणघोडा हा सिंह-वाघापेक्षाही खतरनाक आहे. याआधी तुम्ही पाणघोड्याच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहिले असतील मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी वाहनाजवळ येऊन उभे राहून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही जंगल सफारीसाठी जाताना शंभरवेळा विचार कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्यटक जंगल सफारीसाठी जंगलात गेले आहेत यावेळी समोर पाणघोडा दिसला असता त्यांनी त्यांची गाडी त्याच्या जवळ घेऊन जाण्याची चूक केली अन् गाडीला पाहून पाणघोडा भडकला, अन् मग त्यानं रागाच्या भरात पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान पर्यटक जीव वाचवण्यासाठी शक्य तितके लांब पळू लागले. पण पाणघोडा काही ऐकेना. त्यानं पाठलाग करणं सुरूच ठेवलं. सुदैवानं ही मंडळी गाडीमध्ये होती. त्यामुळे लगेचच त्यांनी वाऱ्याच्या वेगानं गाडी पळवून आपला जीव वाचवला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ Latest Sightings या युट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. एकानं म्हंटलंय, “मस्करीची कुस्करी व्हायल वेळ लागणार नाही” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “त्यांच्याच घरात जाऊन त्यांनाच भिडताय का ?”