Viral video: लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
एका हरणानं चक्क सिंहाला अस्मान दाखवलंय. जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका सांबर हरणानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका हरणानं जंगलातल्या चक्क दोन विशाल प्राण्यांना आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंहाला हरणाची शिकार करणे चांगलंच महागात पडलंय. सांबर हरणाची शिंग सर्वांनाच माहिती आहे. हरणाकडे सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगंही आहेत. मात्र याच शिंगाचा वापर हरीण स्वत:चा बचाव करण्यासाठी करतो. अशाचप्रकारे हरणाने सिंहालाही शिंगानी जखमी केलं. हे संपूर्ण शिंग सिंहाच्या तोंडात घुसलं आहे. सिंह खूप वाईटरित्या जखमी झाल्याचं दिसत आहे. अवघ्या काही क्षणांच्या आत हा डाव पलटला आहे. शेवटी सिंहाची झालेली अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @vip_thoughts99 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना गर्व कशाचा करता? “वेळ बदलायला वेळ लागत नाही” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.