Shocking video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमध्ये रिक्षा चालक रिक्षा घेऊन जात आहे. यावेळी रस्त्यच्या कडेला एक सायकल उभी दिसते, मात्र ती सायकल रिक्षाला अडचण होत आहे. त्यामुळे रिक्षाचलकानं ती सायकल बाजूला करण्याएवजी तिला ढकलून देत कडेला टाकली. दरम्यान रिक्षा चालकानं पुन्हा रिक्षा पुढे घेतली आणि ती सायरल पुन्हा रिक्षाच्यामध्ये आली. यावेळी तो रिक्षामधून उतरला आणि हातानं सायकल बाजूला करु लागला, मात्र मागे तोपर्यंत रिक्षा घसरत पुढे गेली आणि पुढे जाऊन एका खड्ड्यात पडली. अवघ्या काही सेकंदात त्याला आपल्या कर्माची शिक्षा मिळाली. त्याच्या रिक्षाचा अपघात झालाा आणि मोठे नुकसान झाले.
तुम्ही कितीही श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असला तरीही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग तुमच्या चांगल्या, वाईट कर्मांवर अवलंबून आहे. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते. शिवाय आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असं म्हणतात, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nikhilrana.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला दु्प्पट मिळतं. मग आनंद असो वा दुख: आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं, याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.