Shocking video: हल्ली आपल्या सर्वांची जीवनशैली खूप धावपळीची बनली आहे. तरीही आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच लोक फिट राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. सध्याच्या जीवनशैलीमुळं लोकांकडे वेळ कमी असतो. त्यामुळं लोक ऑनलाइन वस्तू ऑर्डर करू लागले आहेत. यामध्ये आता खाण्या पिण्याच्या वस्तूंचाही समावेश होऊ लागला आहे. तुम्हीही फळ भाज्या ऑनलाईन मागवत असाल तर समोर आलेला व्हिडीओ पाहून धक्का बसेल. तुम्ही बाजारातून भाजी किंवा फळं आणायला गेलात तर, अनेकदा काय ताजं आहे आणि काय लवकर खराब होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येतं. तसेच समोर किती स्वच्छता आहे हे सुद्धा दिसतं. मात्र जेव्हा आपण हे ऑनलाईन मागवतो तेव्हा ते कशाप्रकारे आलेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसते. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.
पुणेकरांनो हा प्रकार पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. कारण जी फळं तुम्ही पौष्टीक म्हणून खाताय त्याची बाजारात काय परिस्थिती आहे पाहा. पुण्यातील एका फळ विक्रेत्याच्या दुकानात ठेवलेली फळं चक्क वटवाघुळ खात आहे. पुण्यातील एका फळ विक्रेत्याच्या स्टॉलवर वटवाघळाने चिकू खाल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात चिकूच्या ढिगाऱ्यावर बसलेलं वटवाघूळ दातांनी फळं खाताना दिसत आहे. फळांच्या स्टॉलवर पंख उघडे ठेवून वटवाघूळ फळं खात आहे. तो एका फळाचा आस्वाद घेत असताना, तोल जाऊ नये म्हणून शेजारील फळांचे तुकडे घट्ट पकडताना दिसत होता. यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांनी जेव्हा वटवाघुळाला चिकू खाताना पाहिले, तेव्हा त्यांनी आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. कारण वटवाघूळ इबोला, निपाह व्हायरस, रेबीज आणि अगदी कोरोना सारखे आजार पसरवतात अशी नोंद आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DDFMBQmNBX1/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा>> “रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
वटवाघूळ खाल्लेले फळ खाल्ल्यास आरोग्याच्या समस्यांबद्दल नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ mahamtb_wildlife नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत टीका करत आहेत. एकानं म्हंटलंय, “आता खायचं तरी काय?” तर आणखी एकानं म्हंटलंय, “पुणे तिथे काय उणे”