Shocking video: सून आणि सासू- सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सुक्षिशित डॉक्टर महिलेनं आपल्याचं वृद्ध सासू – सासऱ्यांना काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासू-सासरे हे दुसरे आई-बापच असतात असं सगळेच म्हणतात मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण आपल्याच वृद्ध सासऱ्यांना ही महिला अमानुषपणे मारहाण करत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कर्नाटकातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बेंगळुरूमधील एक डॉक्टर महिला तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे. ही महिला वृद्ध सासूसाऱ्यांचा कशाप्रकारे छळ करत आहे. ८० वर्षीय सासऱ्यांना, जे हृदयरोगी होते त्यांना लाथ मारताना दिसत आहे. तर सासूला, ज्या कर्करोगाने ग्रस्त होत्या त्यांचे मंगळसूत्र ओढून त्यांनाही मारहाण केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सून प्रियदर्शिनी ओरडताना, तिच्या सासूला केसांपासून ओढताना आणि तिची मुलगी वृद्ध जोडप्याला लाथ मारताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे आणि महिलेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रियदर्शिनी एन नावाच्या महिलेविरुद्ध अन्नपूर्णेश्वरी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध जोडप्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप केल्यानंतर, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं
तिचे सासरे जे. नरसिमैया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रियदर्शिनी, तिचा मुलगा आणि मुलगी १० मार्च रोजी रात्री ८:३० वाजता त्यांच्या घरी गेली आणि त्यांनी पत्नी आणि मुलगा नवीन कुमार यांना मारहाण केली.नरसिमैया यांनी आरोप केला आहे की प्रियदर्शिनीने यावेळी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) अनेक कलमांखाली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये दुखापत करणे, चुकीचा प्रतिबंध घालणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे असे आरोप समाविष्ट आहेत.नरसिमैया यांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांच्या मुलाने २००७ मध्ये प्रियदर्शिनीशी लग्न केले होते परंतु त्यानंतर लगेचच घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
पाहा व्हिडीओ
प्रियदर्शिनीने केले आरोप
दुसरीकडे, प्रियदर्शिनीने दावा केला की तिला तिच्या सासरच्यांनीही तिला त्रास दिला. पोलीस सध्या दोन्ही बाजूंच्या दाव्यांची चौकशी करत आहेत, ज्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचाही समावेश आहे.