Shocking video: सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, व्हिडीओ पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात. मात्र, समोर आलेल्या अपघातात या बाईकचालकाचा अतिशहाणपणा त्याच्या अंगलट आल्याचे दिसत आहे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral

प्रवासासाठी कुठेही निघाल्यावर रस्ते मोकळे मिळतील तेव्हाच शक्य तितका प्रवास उरकण्याचा अनेकांचा बेत असतो. कारण- प्रवासादरम्यान एकदा का थांबत राहण्याची सुरुवात झाली, की अजाणतेपणे हा प्रवास लांबत जातो आणि मग प्रवासातील उत्साह निघून जातो. मागील काही वर्षांमध्ये खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जगातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, एक दुचाकीस्वार ट्रॅफिक जाम झालेल्या रस्त्यावरून वाट काढत चालला असताना थेट दोन बसमधून त्याची बाईक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि अडकतो. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा बाईकचालक दोन बसमध्ये अडकलेला असताना दोन्ही बसपैकी एक बस जरी पुढे-मागे झाली असती तरी तो तरुण अपघातात सापडला असता. मात्र, बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा तरुण बचावला. बसमधील प्रवाशांनी बस ड्रायव्हरला अलर्ट करीत याची माहिती दिली आणि बस बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे तो तरुण बचावला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “खेळताना रंग बाई होळीचा…” लावणीच्या कार्यक्रमात आजोबांचा जबरदस्त डान्स; एका VIDEO मुळे झाले फेमस

हा व्हायरल व्हिडीओ आपल्याला @DriveSmart-IN या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader