Shocking video: जंगली प्राण्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. वाघ, सिंह, बिबट्या, मगरी अशा खतरनाक शिकाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. बरं, या व्हिडीओंमध्ये कधी कोणी झाडावर चढून शिकार करताना दिसतं, तर कोणी थेट पाण्यात सूर मारतं. काही वेळा तर जबरदस्त टक्करचे मुकाबले सुद्धा होतात. असो, पण यावेळी आम्ही तुम्हाला जमिनीवरची नाही तर आकाशात होणारी हाणामारी दाखवणार आहोत. घार आणि बगळ्याचं आकाशातल्या युद्धाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असून ती अकाशात उचांवरून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते. घार हा शहरात सहजपणे वावरणारा एक शिकारी पक्षी आहे. आता शिकारी म्हटले की त्याला हत्याराची जोड आलीच. दणकट अणकुचीदार चोच, तीक्ष्ण नखे, मजबूत पाय व पंजे, उडण्यासाठी व झडप घालण्यासाठी मोठे पंख व सहजपणे वळण्यासाठी लांब शेपूट हे सर्व अवयव घारींना उत्तम शिकारी होण्यास मदत करतात. तर दुसरीकडे बगळा बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. हे दोघेही अनुभवी आणि खतरनाक शिकारी आहेत अशात दोघांमधील या युद्धात नक्की कोण कोणावर भारी पडतं? आणि कोणाचा यात विजय होतो? हे तुम्हीच पाहा.

A student Missed school for two days and watching tv at home
शाळेला दोन दिवस दांडी मारुन घरी निवांत टिव्ही पाहत होता विद्यार्थी, अचानक शिक्षक आले; पाहा VIDEO, पुढे काय घडले…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
Bullock cart to help Ferrari in Alibaug news
VIDEO:जेव्हा फेरारीच्या मदतीला बैलगाडी येते…
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Girls perform lavani
VIDEO: आरारारा लैच खतरनाक! काय ती ‘कातील अदा’ “अशी मी मदन मंजिरी…” गाण्यावर तरुणींची जबरदस्त लावणी एकदा पाहाच
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यावेळी सुरुवातीला निळ्याशार अवकाशात घार आपल्या एका पायात मासा घेऊन उडत असल्याचे दिसते. तितक्यात मागून बगळा वाऱ्याच्या वेगात येतो आणि थेट घारीच्या पायातील मासा आपल्या तोंडात पकडून खाली उतरतो. यावेळी घारीनं आपल्या चोचीनं जोरदार पलटवार केला. पण बगळा सुद्धा तरबेज शिकारी आहे त्यानं मग पूर्ण ताकतीनिशी या घारीलाच खाली खेचण्यास सुरूवात केली. घारीला काही समजेल तेवढ्यात बगळा आपली ही शिकार फस्त करून टाकतो. अखेर घार आणि बगळ्यातील या लढतीत बगळा विजयी ठरतो आणि घारीला आपली हार पत्करावी लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>शिकारीच झाला शिकार! म्हशीने केलं सिंहाला गार; जंगलाच्या राजाला तुडव तुडव तुडवले अन् मग जे घडले… थरारक Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर mark.smith.photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “दुसऱ्याच्या तोंडचा घास पळवणारे प्राणीही असतात हे आद कळलं.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, प्राणीही आता हुशार झाले आहेत” तर आणखी एकानं लिहलंय, “निसर्ग खूप क्रूर आहे पण सुंदर आहे”.

Story img Loader