Shocking video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडत नाही. धबधब्यांवरून पडणारे कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते. त्यात अथांग समुद्रातील जैवविविधता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये; कारण ते प्राणघातक ठरू शकते. समुद्र खवळला की मग कुणाचेच खरं नाही. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर समोर आली आहे. यामध्ये ३०० प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

हा व्हिडीओ गोव्यातील असल्याचा नेटकऱ्यांचा दावा आहे, पण हा व्हिडीओ गोव्यातील नसून मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील असल्याचं समोर आलंय. या राज्यातील एका नदीत ३०० प्रवाशांनी भरलेली बोट अचानक उलटली आणि त्यात ७८ जणांचा मृत्यू झाला. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राज्य व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख अब्दुल्लाही बाबा-अरह यांनी सांगितलं की, शनिवारी काही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. ही बोट इस्लामिक उत्सवातून ३०० हून अधिक लोकांना परत आणत होती. मात्र, त्यानंतर अचानक ती नदीत उलटली आणि त्यातून प्रवास करणारे प्रवासी पाण्यात बुडाले.

नेमकं काय घडलं?

टायटॅनिक जहाज अतिशय मोठं आणि आलिशान होतं. पहिल्याच प्रवासाला निघालेलं हे जहाज बुडालं, ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे. दरम्यान, आता समोर आलेला व्हिडीओ पाहूनही ‘टायटॅनिक’सारखं दृश्य डोळ्यासमोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक अथांग असा समुद्र दिसून येत आहे. या समुद्रात दोन बोटी दिसत आहेत. एका बोटीमधून एक व्यक्ती संपूर्ण घटना कैद करत आहे, तर दुसरीकडे एक मध्यम आकाराची बोट दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्ही पुढे पाहिले तर जी समुद्रात अनेक व्यक्तींनी भरलेली बोट दिसतेय ती पाण्यातून येत आहे. मात्र, बघता बघता समोरून येणारी बोट संपूर्ण पाण्यात पडून त्यामध्ये असणारे सगळे प्रवासीही पाण्यात पडतात. यावेळी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लोकांच्या किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोल्हापूर म्हणजे नाद खुळा! भर चौकात आणलं असं काही की लोकांचा लागल्या रांगा; VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. यावेळी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ”आफ्रिकन काँगोमध्ये बोट उलटून ७८ जणांचा मृत्यू झाला” असे लिहिण्यात आलेले आहे.