Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात गाडीवरील नियंत्रण सुटतल्यानं झाला. यामध्ये एका एसटी स्टँडवर बसलेल्या तरुणाच्या अंगावरच ड्रायव्हरने बस घातली. यानंतर पुढे काय झालं हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.
रस्त्यावर अपघाताचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण कधी बस स्टॉपवर अपघात झाल्याचं पाहिलंय का? मग हा व्हिडीओ पाहा यामध्ये, संपूर्ण बस स्थानक प्रवशांनी गजबजलेलं दिसत आहे. प्रवासी बसची वाट बघत बस स्टॉपवर उभे आहेत तर कुणी बसले आहेत. असाच एक तरुण बस स्टॉपवर बसलेला असताना अचानक जवळ जवळ अर्धी बस त्याच्या अंगावर आली. काही वेळात बस तरुणाच्या पूर्ण अंगावर चढते, कारण या बसवरील चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज आहे. मात्र क्षणात बस चालक बस पाठी घेतो आणि तरुण तेथून उठतो. तरुणाच्या जवळ असलेले सर्व प्रवाशी हैराण झालेले दिसत आहेत. कारण एवढ्या मोठ्या अपघातात तरुण सही सलामत राहिला त्याला काही दुखापत झाल्याचं दिसत नाहीये.
व्हायरल व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 24onlive नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.