Viral video: लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर अलिकडे बरेच व्हायरल होत आहेत. यात काही विचित्र घटना बघायला मिळतात तर काही घटना अशा असतात ज्या विचार करायला भाग पाडतात. हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या लेकीची पाठवणी तिचे आईवडील वाजत गाजत करतात. तिच्या लग्नात तिला हवं-नको ते सारं पाहतात. तिच्या त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालतात. लेकीचा संसार चांगला व्हावा, फुलावा याकरता तिचे आई-वडील हवं ते सारं काही करतात. पण एवढं करूनही मुलगी सासरी नांदली नाही तर? मुलीनं रडत-खडत का होईना सासरी नांदावं, तिचं एकदा लग्न लावून दिलं की तिने परतीची वाट धरू नये म्हणून पालक देव पाण्यात घालून ठेवतात. पण सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये नवरीच्या आईनं भर मांडवात नवरदेव दारु पिऊन आल्यामुळे लग्न मोडलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आईच्या या कृतीचं अनेकांना आश्चर्य वाटत असलं तरीही हे पाऊल स्वागतार्ह म्हणावं लागेल. कारण, मुलीने दुःखात संसार करण्यापेक्षा सुखात माहेरी राहावं, हा विचार मनात येण्यासाठी समाजातील चौकटींना मोडीत काढण्याची धमक आई-वडिलांमध्ये असावी लागते.
नवरीच्या आईनेच भर मंडपात लग्न मोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नवरदेव वरात घेऊन लग्नामंडपात पोहचला पण नवरीच्या आईने ती वरात परत पाठवली. एवढंच नाही तर तिने स्टेजवर उभे राहून हे लग्न होऊ नये म्हणून उपस्थित पाहुणे मंडळींना विनंती केली. मात्र सोशल मीडियावर वधूच्या आईचे कौतूक होत आहे. हे प्रकरण बेंगळुरूमध्ये घडले आहे.
झालं असं की, नवरदेव स्वत:च्याच लग्नात मद्यधुंद अवस्थेत आला. एवढंच नाहीतर त्यानं विधीदरम्यान गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर नवरीच्या आईनं कठोर निर्णय घेत आलेल्या पाहुण्ंयाना आणि नवरदेवाच्या घरच्यांना हे लग्न आम्हाला मान्य नाही तु्म्ही परत दा असं सांगितलं. तसंच आताच ही वृत्ती असेल तर उद्या आमच्या मुलीच्या भविष्याचं काय? असा सवालही नवरीच्या आईनं केला. दरम्यान समाजाचा विचर न करता केवळ आपल्या मुलीचा विचार केल्यानं आता या नवरीच्या आईचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video
सोशल मीडियावर हा व्हिडीओ news.for.india नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.