Viral video: लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर अलिकडे बरेच व्हायरल होत आहेत. यात काही विचित्र घटना बघायला मिळतात तर काही घटना अशा असतात ज्या विचार करायला भाग पाडतात. हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या लेकीची पाठवणी तिचे आईवडील वाजत गाजत करतात. तिच्या लग्नात तिला हवं-नको ते सारं पाहतात. तिच्या त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालतात. लेकीचा संसार चांगला व्हावा, फुलावा याकरता तिचे आई-वडील हवं ते सारं काही करतात. पण एवढं करूनही मुलगी सासरी नांदली नाही तर? मुलीनं रडत-खडत का होईना सासरी नांदावं, तिचं एकदा लग्न लावून दिलं की तिने परतीची वाट धरू नये म्हणून पालक देव पाण्यात घालून ठेवतात. पण सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये नवरीच्या आईनं भर मांडवात नवरदेव दारु पिऊन आल्यामुळे लग्न मोडलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आईच्या या कृतीचं अनेकांना आश्चर्य वाटत असलं तरीही हे पाऊल स्वागतार्ह म्हणावं लागेल. कारण, मुलीने दुःखात संसार करण्यापेक्षा सुखात माहेरी राहावं, हा विचार मनात येण्यासाठी समाजातील चौकटींना मोडीत काढण्याची धमक आई-वडिलांमध्ये असावी लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा