Sambhaji Nagar Heart Attack At Gym: संभाजीनगरमध्ये जिम करत असताना एका व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत ​​नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला.

या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जीममध्ये व्यायाम करताना तुम्हीही ही चूक करत नाही ना हे जरूर पाहा. हा मृत्यूचा सगळा थरार जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणसाच्या जीवाचा खरंच काही भरोसा नाही, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर निघेल.

man arrested for wifes murder in Virar
विरारमध्ये पत्नीची हत्या, पतीला अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
Jodhpur Gangrape Hospital
Jodhpur News: जोधपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन जण ताब्यात
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
uttarakhand police news cow meat
Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!

नेमकं काय घडलं?

सिमरन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये आले होते. व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि काही क्षणामध्येच त्यांचा मृत्यू झाला. कवलजीत सिंग बग्गा यांच्या मृत्यूचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कवलजीत सिंग बग्गा जिममध्ये सहकाऱ्यांसोबत व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम सुरू असतानाच कवलजीत सिंग अचानक बाजूच्या भींतीवर धडकले आणि मग अवघ्या ५ सेंकदात ते खाली कोसळले. यानंतर जिममधले सहकारी कवलजीत सिंग यांची मदत करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत. दरम्यान, त्यानंतर कवलजीत सिंग यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईत चाललंय तरी काय? महिलेला पाहून तरुणाने काढली पँट अन्…; जुहूमधील संतापजनक VIDEO व्हायरल

बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. संभाजीनगरमध्ये जिम करत असताना व्यावसायिकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यायाम सर्वांसाठी जरूरीचा आहे, पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात. व्यायाम करणे चांगले असले, तरी जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे. अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ येण्याची शक्यता असते. त्याला अचानक आलेला हृदयविकाराचा झटका असेही म्हटले जाते.